उजाडले आज, काही तरी चित्तीं।
अमोल संपत्ति, प्राप्त झाली।
तेजांची भांडारे, खुली झाली सर्व।
पावलें हे पर्व, आनंदाचें।
संपले देहाचे, दास्य ते दीनवाणें।
कुणाचे न देणें, उरे आतां। ११५
चालतांना यावे, अधांतरी ऐसें।
मनीं का येतसे, सदा सांग।
पायांनी चालतां, खालची ही भूमी।
कधी ही सर्वथा, न संपेल।
पृथ्वी ही हिंडलो, जरी मी ना सारी।
येणें तुझ्या घरी, नसे शक्य।
स्थलातीत वास, तुझा ना तो आई।
कसा जवळी येई, स्थलांतरे।