पाहिलेस तेज, परि तो तारक
तुला न ठाऊक, व्हावयाचा
मनी ठेविलीस, सौरभाची भूल
फुले कोठे फूल, परी सांग
ऐकिलेस माझे, जरी प्रेमगीत
ह्रदय हे अज्ञात, असे तुला
ढोलक्याचा नाद, दूर कोठे तरी
येऊनी अंतरी, दुणावे तो
गंभीर (अज्ञात) अर्थ जे, सवे त्यांच्या येती
तयांनाच निशा, ठेवि चित्तीं
जवळ तूं नसतां ते, उसने मी घेउनीं
संतोषतों मनीं, तशा वेळीं
(चितितों ते मनी पुन्हां पुन्हा।)