केतकीच्या पोटीं, विषारी नागिण
कमलिनीकर्तन, करी भृंग
किडा उंबरांत, प्रेमांत वासना
सदा असावी ना, मृत्यू लोकीं
मनी माझ्या होते, तेच आले घडुनी
कळी आली फुलुनी, इच्छिलेली
मनीची तारका, नभांगणी नाचे
सूर अंतरीचे, आले ऐकू
देवता चिंतिली, अवतरे तीच ही
जीव जन्म घेई, इष्ट देही