भयाण रात्रीच्या, मनामध्ये जाऊ
धीरतेने गाऊ, आत्मगीत
काळ्या काळ्या जगा, भ्यावयाचे नाही
तुला हीच ताई विज्ञापना
वादळात असल्या, कुठे सापडुन
आलीस कोठून, इथे सांग
केस हे विखुरले, स्कंधदेशी भाली
आणि काही गाली, खेळतात.
थरारे अंग हे, भीती मूर्तिमंत
जणू सिध्द होत, शरीरिणी
चिंब ओला पदर, या तुझ्या नयनांनी
अश्रूस गाळूनी, असा केला
शून्य दृष्टीने या, धरेस पाहसी