तुझी ती अंगुली, जाई ओठापाशी।
सांगते गूज कांही, बोलते तुझ्याशी।
अंगुली ताईने, तुला माझे हृदय
विदित केले काय, मला सांग।
अनंतते।
छे, न आले मनी, कधीही हे असे
मला ही उसासे, असे यावे
निसर्गते नला, करुनी दीनवाणी
का अशी जीवनी, फिरवतेस
हिरकणीसारखी, कठोर जी वृत्ती
तिला का ही प्रीती, आठवावी?