तृषितात्म हा मी का? अशी जवळी नदी
भोवती ही गर्दी, एकला मी!
सखी ही शेजारी, भेटता का न ये
जीव का न आहे, शरीरी या
’स्मृती’ च्या सौख्याने, संतोष ही अधिक
’प्रत्यक्षता’ धाक, दावि काही
मनोमयी मूर्ती, कशी केव्हा वंदा
जीवहा सर्वदा, असे स्वस्थ
ऊन प्रत्यक्षाचे, जाळिते नेत्रांना
स्मरण-सावलीला, भुले जीव