विरोधी भावांनी, विनटलेला जीव
सांडितो न शीव, संशयांची
हंसे तोंडावरी, फाकलेलें दिसे
अंतरी कांहीसे, परी दु:ख
समजल्या सत्याचा, काही एक प्रांत
राहतो अज्ञात, बुद्धीला या
दोन जीवांमध्ये, फुलेल्या प्रेमाला
वास केव्हा आला, पूर्णतेचा
दिलाच्या दगडाला, भक्तीची गोफण
देत भिरकावून, तुझ्या पायी
दगड तो लागू दे, तुझ्या ह्रदयावरी
प्रति-प्रेम झरी, वाहु लागो