सुप्त मी असता हा, ’सुधामधुर’ श्वास
चुंबूनि गेलास, सख्या दूर
जागृतीची माझ्या, एवढी ही भीति
वागते का चित्ती, सख्या, सांग
छ्द्मनिद्रा माझी, असतेच नेहमी
फसवित्ये तुला मी, न तू मला
निराश युवका ते, तुझे प्रणयस्वप्न
न जावॊ भंगून, अजूनिही
आज देवाजीला, सांगून रात्री मी
तुला प्रेमधामी, बैसवीन
निराश होण्याची, भाक मी घेईन
शेकडो ही जन्म, तुझ्यासाठी