पवित्र प्रेमाचे, पारिजात फूल
एकदा फुलेल, अन्तरात
देवपूजेसाठी, तयाला ठेवावे
कधी न हुंगावे, वासनेने
धजत नाही हात, फुले तोडावया
कशी इतुकी दया, तुला त्यांची
ह्रदय मात्र माझे, सहज तुडविलेस
स्वप्न भंगिलेस, क्षणी एका
जा सुखे कुठेही, फुल ते हुंगीत
स्वप्न कुस्करीत, कुणाचे ते
तुझ्या गीतांमुळे, कुणी एक ह्र्दय
होई भग्नप्राय, क्षणोक्षणी