आकाशगंगा ही, आली भूमीवरी
तुझ्याच आचारी, आटली जी
तिची ती धवलता, तुझे हे जीवित
स्मरो माझे चित्त, सर्वकाल
तुझ्या पायांपाशी, ही एक प्रार्थना
देवाच्या दर्शना, जाऊ दोघे
भगिनी की माय, तू की पूज्य देवता
माझिया जीविता, करी सार्थ
एका संध्याकाळी, देवळासी जाऊ
आत्मगीत गाऊ, अंतरीचे
दिलाच्या दर्यात, मारूनिया बुडी
सदाची का दडी, दिली येथ
नीघ काठावरी, पुरे झाले स्नान
कंटाळ्ले मन, सये तुजला