फिरकसी का सांग, वनात या दाट
करी शिरी थाट, फुलांचा हा
जाऊ चल ना गडे, भीति वाटे चित्ता
होऊनी तू लता राहशील
कोणी एक लता, लाविलीसे रानी
तिला मला पाणी, घालायाचे
वाढेल ना कधी, ती साध्या पाण्याने
लोकांच्या गाण्याने डुलेल ना
मीच जेव्हा तिला, कुरवाळीन हळू
आणि मी चुंबीन, भक्तिभावे
तेव्हाच ते प्रेम, बहरेल दिव्य
आंतर सौंदर्य, खुलेल की