तुझ्या श्वासातूनी, सुगंध सांडला
गुलाब हा झाला, तयाचाच
तुझ्या नेत्रांतूनी, उडाला हा किरण
तारका होऊन, नभी बैसे
तुझ्या सौंदर्याचे, सुवास-सेवन
करायास नयन, भृंग झाले
किरणगुंजी असली, घालतांना त्यांस।
पंख हलवायास, नुरे भान।
म्हणूनी राहिले, अचल ते स्वस्थानीं।
तुला मी गाऊनी, आळवितांना।