सहज बोललीस, शब्द तो तू गूढ
चित्त माझे मूढ, सये झाले
जीवास वाटले, आनंदाची उषा
घेत शब्दवेषा, जणू आली
बोलण्याचा धीर, केलास क्रोधाने
स्निग्ध का स्वराने, तसे व्हावे
निरोप घेताना, ओठ का अडखळे
चित्त का खळबळे, तुझे सांग
चाललो पहा मी, पुन्हा खुणावितो
बोलका नेत्र तो, सये तुझा