इतरांचे वैभव, पाहवेना जिला
दृष्टि ही कशाला, मला व्हावी
आंधळा भिकारी, उभा दारी आहे
नेत्र देऊ का हे, तयाला मी
कोठल्या ह्र्दयात, साठविसी रूप
कुठल्या देशी भूप, देव-देवा
प्रभाताच्या पोटी, रजनीच्या की पाठी
आकाशाच्या काठी, दडेलास
तायांच्या तेजात, विजेच्या लोळात
किंवा वादळात, नाचतोसी
फुलामध्ये फुलसी, नदीत नाहसी
वेलीत लपतोसी, कसा सांग
वेदांच्या ज्ञानात, शास्त्रांच्या साच्यात
किंवा कवितेत, वास तुझा
न शास्त्रज्ञानात, न सृष्टि दृश्यात
वसे मी कवितेत, तुझ्या त्यांच्या