धैर्य हेचि ज्ञान, भीति हे अज्ञान
उदात्त जीवन, धैर्यशाली
भीतीने होतसे, पापसिध्दी मनी
अभयता वर्तनी, नीति हीच
पाथेय गीतांचें, सवें घेऊनी यां
मार्ग चालावया, लागलों मीं
परीं हे वाढते, गीतांचें वैभव
आणि आत्म-देव, असंतुष्ट
संपेल जेव्हां तें, तेव्हांच हे प्राण
वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म