प्रकाशाने केली अदृश्य ही सृष्टी
नेत्रयुग्मी दृष्टी, लुप्त झाली
बिचारे तर्काने ज्ञान गेले दूर
गळ्य़ाने बेसूर, गीत झाले
साधनांच्या योगे, दुरावले साध्य
नष्टले आराध्य, आराधने
होईना का माझा, देह भस्मीभूत
जरी आत्मज्योत, चिरस्थायी
पाकळ्यांचे ओझे, कशाला हे व्हावे
सौरभे हिंडावे, स्वयंसिध्द