बाह्य कोलाहली, मनाची शान्तता
वाढते सर्वथा, कशी माझी
स्मशानात कैसा, ऎकू येई स्वर
जयाने हा धीर, धरी जीव
अन्धाराच्या भाली, तारा का हा दिसे
ज्ञान का हे हसे, भ्रमासवे
गिळाया मोजके, सुखाचे हे क्षण।
सदा पसरी वदन, भूतकाळ।।
दु:ख मात्र तितुके, स्मृतीच्या करंड्यांत।
घालुनीयां परत, करी माझें।।