प्रकाशांची संख्या, असंख्य आधीच
वाढवूनी उगीच, काय लाभ
आकाशकंदिली, झाडावरी एका
मिणमिणा दिवा कां, लावियेला
दरिद्री शब्द हे, कशाला मीं गावे
व्यर्थ का मिरवावे, क्षुद्र तेज
लहान रोपटी, समुद्राच्या काठी
चार दिवसांसाठी, सुखे डुलती
क्षणात नष्ट हो, समुद्राचा फेस
तरी हा उल्हास, तया वाटे
तुला मात्र जीवा, वेड अमरत्वाचे
लागुनी सदाचे, मिळे दुःख