नभात सांगती, चंद्रिकेची किरणे
मनात चांदणे, तसे माझ्या
सहज झाली तुझी, इतक्यात आठवण
चित्त हे लक्ककन, उजाळले
प्रताप तेजा, स्मृतीचाही इतका
प्रत्यक्श कौतुका, नुरे उपमा
सदा हा नावरे, अन्तरी सुवास
तया फेकी श्वास, जगामध्यें
प्रतीति सत्याची, आत्मदेवा झाली
गीत-वाणी आली, अशी ओठी