माझिया गीतांना, आली निःशब्दता
स्वानुभव येता, सत्यतेचा
अमृत्वामध्ये, गेलो मी उडून
पंख हलवून, मर्त्यतेचा
येथवरी देवा, आले कसे तरी
आता येई उरी, निराशा ही
पाऊल एकही, पुढे टाकवेना
दृष्टील दिसेना, भोवताली
जीवनी अप्रेम, मृत्यूचाही वीट
करी कोण धीट, अशा वेळी