सारी ही आस्तित्वे, असतात बापुडी
कोणासाठी खडी, कोण जाणे
एकमेकांचा त्या, लागतो आधार
असा हा विस्तार, किती भव्य
व्हावयाचे काय, आपुले शेवटी
ही न शंका पोटी, कुणाच्याही
विकारांचा वास, चित्तांत असतांना
सत्याच्या दर्शना, कसा जाऊं
खळबळाट चाले, जलाच्या या पृष्ठीं
पाहि कैसी दृष्टि, तिथे चंद्रबिंब