फूला-फत्तरात, एवढा हा फरक
फुलाला ठाऊक, कोमेजणे
हेच माझे भाग्य, मरणार मी आहे
अमृतत्व राहे, मला दूर
प्रतिभेच्या मैनेचे, मोडले ते पांख
आणि फुटला आंख, बुद्धिचाहि
गळाही दाबला, गीतकोकिलेचा
स्तब्ध झाली वाचा, तिची आतां
सर्वस्व सांडले, आत्मतत्त्वानें या
तुला पूजावया, देव देवा