हिंदोळा चित्ताचा, लागला हलाया
स्फूर्ती देवता ह्या, इथे आल्या
म्हणा काही ओव्या, बसा ग जराशा
चाललात कैशा, उभ्याउभ्या
पुन्हा केव्हा तुम्ही, अशा येथे आल्या
आणि आदराल, शब्द माझा
समुद्रात नाचे, लाटांची ही रांग
पीठ हे अथांग, जलपृष्ठ
टांगले हे छत, वरी आभाळाचे
वाजते काळाचे शांतिवाद्य
अशी या गोपीची, रासक्रीडा चाले
सर्व तारे आले, पहाण्य़ा जी