विश्वाचा मी सूर, संचारे सर्वत्र
सत्यार्थ फेकीत, सर्व ठायी
जीवितात माझ्या, विश्वात्मा संस्फुरे
श्वासात संचरे अनंतत्व
मला काही तरी, हवेसे वाटते
जया ही न गीते, कधी गाती
उगम केंद्र नाही, दीप्तीचे या ठावे
सदा का नाचावे, तिने मात्र
भोवती हा उजाळा, कसा कॆव्हा होतो
जीव हा नाहतो, आनंदात