तायाच्या तेजात, दृष्टी माझी नहावी
फुलांनी घडावी, चित्तवृत्ती
निःसंग आकाश, जीव तैसा व्हावा
वायूचा लाधावा, विश्वभाव
मनात लाविली, तेजतारकांची
निशा कायमची, प्राप्त झाली
चंद्रिकेची शोभा, धरावया गेलो
घेऊनी आलो, मेघमाला
विद्युल्लतेमागे, स्वैर धावताना
वादळे ती नाना, पुढे येती
त्याच वादळात, मेघात, निशेत
गेले हे जीवित, सरुनिया