वर्तमान केव्हां, कसा हा संपेल
उत्क्रांति होईल, कधी पूर्ण
भावी कालामध्ये, आतांच जाऊन
पूर्णत: पाहून, सत्य घ्यावें
धीर आतां नुरे, संभ्रमीं वागाया
स्वप्नांत खेळाया, अज्ञेतेनें
आनंद माझे मी, स्वतःला सांगावे
अश्रुही पुसावे, स्वतःचे मी
दुजे कोण मला, प्रेम अर्पिणार
क्षुद्र मी होणार, प्रेय कोणा
एकल्याचा मृत्यू, एकल्याचा जन्म
एकल्याचे प्रेम, मला माझे