मानसाचे माझ्या, भव्य हे स्थंडिल
सत्याग्नि पेटेल, तयावरी
देतो मी आहुती, देहभावांचीही
वृत्ती मग्न राही, आत्मरूपी
नका टाकू उषा, निशेच्या सहित
आणि चंद्रकान्त, खड्यासवे
देहवृत्तीसवे, नका टाकू केव्हा
श्रेष्ठ अहंभावा, अंतरीच्या
सत्य शब्दासवे, देव मूर्तीसवे
फूल देठासवे, नका टाकू