दिक्कालांची सारी, बन्धने विश्वाला
होईल ना मला, स्पर्श त्यांचा
अनुभवांचा माझ्या, पिता आणि स्वामी
चिरंजीव मी अहंरूप
जन्म-कालचा जो, तोची सत्य क्षण।
आभास जीवन, उर्वरीत।।
काल सरितेमध्ये, क्षण तोचि हळूवार।
करी स्थानांतर, एकमात्र।।
वाहुनी तो जाई, वाटते आपणां।
भोगिले मीं क्षणां, लक्षावधी।।