अहंरूपाचीच, चला अर्चा करू
विश्व हे लेकरू, अहंतेचे
ब्रह्मफूल जेथे, फुलेल सर्वथा
वंद्य ती ही लता, अहंतेची
अंतरात पुन्हा, येऊनी संशय
पाहा येई पाय असा मागे
क्षणी होई धीर, क्षणी वाटे भीती
अशी चित्तवृत्ती, जन्मोजन्मी
पाऊल टाकावे, नेत्र जो उघडावे
तो शून्य देखावे, उभे पुढे