पायमाल झाली, आशांची दौलत
घेतली हातांत, राख त्यांची
चिता प्रेमाची त्या, धडाडली भव्य
सव्य वा अपसव्य, नुरे मजला
भस्म सर्वस्वाचे, सर्वांगी चर्चिलें
नंतरी अर्चिले, देव-देवा
अहंतेचे माझ्या, भव्य हे स्थंडिल
तेथेच नांदेल, ब्रह्मसत्य
निरहंभावाला, कोठला अनुभव
कोठले शिवजीव, शून्यतेला