एका स्वप्नातुनीं, दुज्यांत जागृति।
होतसे जीविती, क्षणो क्षणी।।
चर्मचक्षू जेव्हा, सदाचे झांकीन।
तेव्हांच पाहीन, सत्यसृष्टी।।
नुक्त्याच मेलेल्या, भक्तिच्या काष्ठांनी
पेट अंतंकरणी, घेतला हा
त्याच जाळामध्ये, जळॆ ना का देव
नुरे देवघेव, मला त्याशी
एक इच्छा हीच, तया भेटण्य़ाची
जन्मोजन्मी साची, मनी होती
तीही आता नको, नको तो, नको मी
मला शून्य धामी, जाऊ द्या ना