मृत्यूच्या शेजारी, बसूनी जीवित
अमृतत्व-गीत, सदा गाई
मृत्यूला तयाचा, अर्थ नाकळून
स्वतःलाच धन्य, मानितो तो
’अमृततव’ साध्य, ’मृत्यू’ हेसाधन
तया आदरून, ध्येय गाठू
वर्तमान माझा, होईल होवो ते।
जाऊ द्या गेले तें, यदृच्छया।।
भूतकालाचें तें, सांडलें माणिक।
भविष्याची हांक, नसे श्राव्य।।