स्मृतींच्या अश्रूंनी, चित्त माझे झाले
डवरलेले डोळे, तुझे जैसे
अश्रु नेत्री तुझ्या, माझ्या मनी गीते
असे का चालते, अनंतते
हृदय माझे असल्या, वृत्तींनी फुलेले
चित्त हे झुलेले, तत्वरंगी
सखी प्रतिभा असली, जिच्या कटाक्षांनी
विश्व हे मोहुनी, सर्व जावे
ध्यान, गान, मनन, सदा ऍसे चाले
आनंदात डोले, असा जीव
खरे पाहताना, खोटी ही बोलणी
पोर मी रंगुनी, त्यात जाई
परी अनंतते, तुझ्या पायांवरी
जीवाची बासरी फेकिली ना?