आशिर्वाद शाप, अन्नाचा कोळसा
सहज झाला असा, घात माझा
दुधामध्ये खडा, दुपारी अपरात्र
वैधव्य की येत, विवाहींच
जवळी अनंत-ता, आलीशी वाटली
तोंच नष्ट झाली, क्षणामध्यें
जलीं की चंद्रिका, नाचे वरीखाली
मूर्ति तुझी आली, मनी माझ्या
मनोलहरींनो, नका हालू जरा
सौंदर्य सावरा, अनंततेचे