संकीर्ण- (एकूण - ९६ अभंग)
आधी सोईकरीता जे वर्गीकरण केले ते काही कवीने स्वतः केलेले नव्हे. कवी थोडेच असले वर्गीकरण मान्य करणार! यातल्या कशातच निश्चितपणे समावेश करता येत नाही परंतु निःसंशय श्रेष्ठ काव्यगुण असलेल्या अनेक पंक्ती या अभंगात विखुरल्या आहेत.
'अनंतता', 'शुद्रता', 'अहंब्रह्माSस्मि|' - ही ध्येयसृष्टी गाठण्याला व गाठेतो माणसाजवळचे एक मुख्य साधन उत्कट स्नेहभावना. अनेक दृष्टिकोनातून, अनेक पातळ्यांवरून, फार हळुवारपणे, उत्कटतेने व सौंदर्यनिर्मिती करीत ती कवीने अनेक अभंगांत प्रदर्शित केली आहे. याशिवाय निसर्गांतले सौंदर्य व भव्यता, निसर्ग व मानव यांचा संबंध, प्रतिभेचे स्वरूप व प्रयोजन असे विविध विषय या स्फुट अभंगात विखुरलेले आहेत. न्यायरत्नांच्या भाषाशैलीत साधेपणा, प्रसाद, गांभीर्य व अर्थवत्ता यांचा मनोज्ञ समन्वय दिसतो.
सोईसाठी:
भाग -१ (१-६२ अभंग)
भाग -२ (६३-९६ अभंग)