अनंतता : (एकूण -३२ अभंग)
प्रस्तुत ग्रंथात इतरत्र प्रसिध्द केलेल्या आपल्या निवेदनात न्यायरत्नांनी अनंतता या पदाविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. ’अनंतता’ या कल्पनेत सामर्थ्य, पूर्णता, समावेश यांवर भर दिला आहे. -म्हणजेच Non-Exclusiveness 'हेच पाहिजे तेच नको’ या सामान्य मानवी प्रतिक्रियेऍवजी समावेश, संग्राहकता व म्हणून एका अर्थी निरपेक्षता-व अनिच्छा आहे या. दृष्टिकोनात. अद्वत तत्वज्ञानातील ’पूर्ण ब्रह्म’, Spinoza चा 'Substance', Plato ची 'Idea of Good', Aristotle चा 'Unmoved mover God' यांच्याशी अनेक प्रकारे सादृश्य आहे अनंततेचे. कवीने आपल्या प्रतिभेचा हा मुख्य विषय करावा यातच त्याचे वैशिष्ठ्य दिसून येते. फार प्रासादिक शब्दात व उत्कटतेने अनंततेचे आवाहन व वर्णन आहे या अभंगात.
प्रा.प्र.रा.दामले (संपादक)