म.गों.ची धार्मिकता
वेणूबाई व म.गो. यांनी केलेल्या यात्रा (१९२६-२८). माधवराव व वेणूबाईंनी अनेक तीर्थक्षेत्रांचा प्रवास केला. माधवराव व वेणूबाई हे तीर्थयात्रा करीत असताना, ईश्वर कसा आपल्या भक्तांचा सांभाळ करतो हे नेहमी वेणूबाईंच्या निदर्शनास आणून देत. आगगाडीचे तिकीट मिळण्यापासून धर्मशाळेत जागा मिळेपर्यंत ईश्वरी साहाय्याचे क्षण ते टिपीत व वेणूबाईंच्या मुद्दाम लक्षात आणून देत.
स्थळं:
दक्षिण भारत: १९२६
बदामीची कोरीव लेणी, बनशंकरी देवी, हुबळी:सिध्दारूढस्वामी समाधी, हरिहर, म्हैसूर,चामुंडा, श्रीरंगपट्टणम, दौलत (टिपूचे थडगे), बंगलोर, कोलार (सोन्याच्या खाणी), कांची, चिदंबरम, कुंभकॊण, तंजावर, मदुराई, रामेश्वर, श्रीरंग, मद्रास, तिरुपती बालाजी
उत्तर भारत: १९२७
बोरीबंदर-टांकसाळ-वसई-बडोदे-आगड-जवाहिरखाना-डाकोर-उज्जैन-भोपाळ-ग्वाल्हेर-आग्रा-मथुरा-दिल्ली-लखनौ-अयोध्या-प्रयाग-काशी-केदारनाथ-गोकुळ-कुरुक्षेत्र-ठाणेश्वर-हरिद्वार-ऋशीकेश(लक्ष्मणझुला)-बद्रीनाथ
: १९२८
श्रीशैल्यम-श्री मंगेश, शांतादूर्गा, द्वारका, गिरनार, वेरावळ, प्रभास, सोरटीसोमनाथ, पुष्कर, जयपुर, जळगाव, अजिंठा
माधवरावांना भिक्षुकांबद्दल आदर होता. ते ’गुरूजी’ या आदर-संज्ञेने भिक्षुकांचा उल्लेख करीत.
माधवराव नित्य व नैमित्तीक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत परंतु त्या निमित्ताने आप्तेष्टांना आमंत्रणे देऊन उगीच जेवणारांची संख्या वाढवत नसत.
दुपारी तीनच्या सुमारास ते दुधातली अर्धी दशमी खाऊन काशीकरबुवा,कराडकरबुवा यांच्यासारख्याच्या कीर्तनास अगर पाववीशास्त्र्यांच्यासारख्या विद्वद्वरेण्याच्या पुराणास जात.कथेकरीबुवांनी काही नवे श्लोक सांगितले तर ते टिपून घेण्यास ते कधी विसरले नाहीत.