शीर्षक: महर्षि विनोद व त्यांच्यानंतर डॉ. श्री. व सौ. विनोद यांनी जतन केलेल्या ग्रंथ संपदेचा शोध घेणे.
गेली २० वर्षे शांतिमंदिरातील कपाटांमध्ये जतन करून ठेवलेल्या पुस्तकांचे वर्गीकरण करणे, नवीन पुस्तके दाखल करून घेणे, गं्रथ संपदा वाढत गेल्याने, ते ठेवण्यासाठी नवीन कपाटे करणे, या लायब्ररीचे काम पहाण्यासाठी ग्रंथपालाची नेमणूक करणे, इ. कामे सातत्याने चालू राहिलेली आहेत.
गेल्या ४-५ वर्षापासून संगणकामध्ये पुस्तकांविषयीचा तपशील घालण्याचे काम चालू आहे. आत्तापर्यत जेवढे काम झालेलं आहे, त्यानुसार कामाचे प्रतिवृत्त देत आहे-
१९८१च्या सुरूवातीला रजिस्टरमध्ये दाखल करून घेतलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके गहाळ झाली आहेत.
काही जुन्या पोथ्या आणि ग्रंथांना बुरशी लागल्याने ती टाकून द्यावी लागली आहेत.
ग्रंथालयामध्ये काम करणारे मदतनीस बदलत गेल्याने संगणकामधल्या डाटा एंर्टीज तपासताना वेळ लागत आहे.
संगणकामध्ये घातलेला डाटा आणि कपाटातील पुस्तके यांचा तपशील पडताळून पाहण्याचे काम सुरूवातीच्या अंदाजापेक्षा बरेच लांबलेले आहे.
या सर्व कारणांमुळे हे ग्रंथालय बाहेरच्या व्यक्तींना वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा दिवस लांबणीवर पडलेला आहे.
पडताळणीचं काम जेवढं झालेलं आहेे त्यानुसार तिसऱ्या मजल्यावरील मुख्य गं्रथालयामध्ये ४,३६६ पुस्तकांचा समावेश आहे. खालच्या मजल्यावरील गं्रथालयामध्ये ६५२ पुस्तके आहेत.
विषयानुसार वर्गीकरण केले असता एकूण ४३ विषयांमध्ये सर्व पुस्तके विभागली आहेत. अभ्यासकांना पुस्तक सापडावयास सोपी जावीत, या हेतूने हे विषय ठरवलेले आहेत.
प्रत्येक विषयाच्या पुस्तकांचेे दुसऱ्या पातळीचे वर्गीकरण करणे चालू आहे. यानुसार अभ्यासकाला त्याला हव्या असलेल्या उपविषयाची पुस्तके मिळणे सोपे जावे.
इतर ग्रंथालयांप्रमाणे दाखल क्रमांकानुसार पुस्तके कपाटात न लावता सध्या ती विषयानुसार लावली आहेत. यामुळे ग्रंथपाल आणि अभ्यासक या दोघांना पुस्तकांची देवघेव करणे सोपे जाईल, असा अंदाज आहे.
नवीन पुस्तकांची भर सतत पडत असल्याने जुन्या पुस्तकांच्या पडताळणी बरोबरच नवीन पुस्तके रजिस्टर आणि संगणकामध्ये दाखल करून घेण, हे काम सतत चालू असतं.
सुरूवातीच्या काळामध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ग्रंथालयाच्या कामासाठी विनामुल्य सेवा दिलेली आहे. गेली ४-५ वर्षे अर्धवेळ काम करणारे कार्यकर्ते अल्प मानधन घेवून हे काम करत आहेत.
पुस्तकांचा डाटा बेस तयार करणे, वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडवणं आवश्यकतेप्रमाणे डेटाबेसमधल्या रचनेमध्ये बदल करत जाणं, पडताळणीचे तंत्र विकसित करणं या सर्व कामांमध्ये संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संगणकतज्ञ श्री. सुनील चिंचणीकर यांची बहुमोल मदत होत आहे.
राहिलेले काम-
पुस्तकांची पडताळणी पूर्ण होणं
विषय आणि उपविषय याप्रमाणे वर्गीकरण पूर्ण होण.
म. विनोदांच्या काळामध्ये ग्रंथालयात दाखल झालेली पुस्तके आणि त्यानंतर दाखल झालेली पुस्तकं यांची नेमकी संख्या कळणं.
लेखकांप्रमाणे पुस्तकांची सूची तयार होणं.
कोणत्या भाषेमध्ये किती ग्रंथ उपलब्ध आहेत, याचा तपशील निश्चित होणं.
या अत्यंत कष्टाच्या आणि जिकिरीच्या कामासाठी विनामूल्य सेवा अनेकांनी दिलेली असतानासुध्दा बराच निधी लागलेला आहे. लवकरात लवकर राहिलेलं पडताळणीचं काम पूर्ण होऊन अभ्यासंूना ही ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शेवटच्या टप्प्यातील या कामासाठी सुनंदा काकडे या ग्रंथपाल अर्धवेळ येऊन काम करीत आहेत. येत्या वर्षामध्ये हे सर्व काम पूर्ण व्हावे, अशी इच्छा आहे.
या कामामध्ये योगदान दिलेल्या सर्व नव्या-जुन्या ग्रंथपालांचे, कार्यकर्त्यांचे, सफाई मदतनीसांचे व कार्यकारी विश्वस्तांचे आभार.
ऋजुता विनोद
(संशोधन प्रमुख म.वि.रि.फा.)
जानेवारी २००४ ते डिसेंबर २००४
झालेले काम :
१) यावर्षी बरीच नवीन पुस्तके ग्रंथालयात दाखल झाली. त्यांची संगणकामध्ये शिींीू करण्याचे काम चालू आहे.
२) स्थानाप्रमाणे पुस्तकं सापडायला सोपं जावं, यासाठी मूळ डेटाबेस चे चार विभाग आम्ही केले. त्यातील तीन विभागांमधील पुस्तकांच्या उपविषयांचे वर्गीकरण पूर्ण झाले आहे. तीन विभागातील पुस्तके एकूण सात कपाटांमध्ये व्यवस्थित ठेवलेली आहेत.
३) मैत्रयी हॉलमधील नऊ कपाटांपैकी सहा कपाटातील पुस्तकंाच्या पडताळणीचे काम पूर्ण झालेलं आहे.
४) असे एकूण १३ कपाटांतील पुस्तकंाविषयीच्या नोटस घालून झालेल्या आहेत.
५) मैत्रयी हॉलमधील काही कपाटांच्या काचा फुटलेल्या होत्या, त्या नवीन बसवून घेतल्या.
६) वाचकांसाठी बैठक व्यवस्था केली.
राहिलेले काम :
उरलेल्या तीन कपाटांतील पुस्तकंाची पडताळणी पूर्ण होणे.
मैत्रयी हॉलमधील ग्रंथांच्या उपविषयांचे वर्गीकरण पूर्ण होणे.
सर्व ग्रंथांना वाचकांना र्खीीीश करताना भरावयाचे कार्ड चिकटवून घेणे.
सर्व ग्रंथ सुस्थितीमध्ये आहेत की नाही हे तपासणे, नसल्यास ते तसे करुन घेणे.
शक्य झाल्यास पुढील वर्षी वाचकांना ग्रंथालय खुले करणे.
सर्व वरींर लरीश भरुन पूर्ण झाल्यानंतर लेखकांप्रमाणे सूची, विषय व उपविषयांप्रमाणे सूची, भाषेपमाणे सूची अशा ३ सूची तयार करणे.
सहाय्यकांचे आभार
कु. सुनंदा काकडे किमान तीन तास सलग सहा महिने या प्रकल्पावर काम करीत आहेत, त्यांना मदत करण्यासाठी मंजुषा खरे यांना या वर्षी घेतले आहे. या सर्व कामावर सुनील चिंचणीकर यांची संगणकीय सुपरव्हिजन असते. या सर्वांचे आभार.
ऋजुता विनोद
(संशोधन प्रमुख म.वि.रि.फा.)