जानेवारी २००४ ते डिसेंबर २००४
प्रकल्प: ५
शीर्षक: महर्षि विनोदां़नी लिहीलेल्या व विविध नियतकालिकांमध्ये प्रसिध्द झालेल्या साधनासूत्रांचा मागोवा घेणे.
प्रत्यक्ष झालेलं काम:
१९८१ मध्ये योगाभ्यासाला सुरूवात केल्यानंतर यथावकाश महर्षी विनोदांचं साधना-सूत्र हे पुस्तक माझ्या नजरेस आलं. अतिशय संक्षिप्त् सूत्रबध्द लिहिलेलं तत्वज्ञान मी पहिल्यांदाच वाचलं. यातल्या कितीतरी वाक्यांनी आयुष्यांकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मला दिला आणि वेळोवेळी योग्य रस्ता दाखवायला मदत केली. माझ्या प्रमाणे इतर अनेकांचा हा अनुभव आहे, हे मी व्यासपौर्णिमेच्या वेळी अनेक व्याख्यात्यांकडून ऐकलं आहे.
साधनासुत्रे या पुस्तकामध्ये एकूण २१ साधनासूत्रे प्रसिध्द झालेली आहेत. या व्यतिरिक्त अनेक साधनासूत्रे पुस्तकरुपानं प्रकाशित होणं बाकी आहे, असं मला महर्षि विनोद स्मृति-संहितेमध्ये वाचायला मिळाले.
१९८४-८५ मध्ये जुने पेटारे शोधतांना रोहिणी, माऊली, ज्ञानदूत, प्रसाद या नावाची खुप जुनी नियतकालिके सापडली. १९४६ पासुन ते १९६९ पर्यंत प्रसिध्द झालेली ही साधनासूत्रे मी गोळा करुन फाईल केली आणि त्यावेळी संस्थेमध्ये योगदान देणाऱ्या काही विद्यार्थी कार्यकर्त्यांना विनंती करुन पाच-सहा वह्यांमध्ये ती लिहवुन घेतली. अधुन मधून ती मी वाचत असे आणि विलक्षण आनंदामध्ये रमून जात असे.
आपल्याकडे एक मोठा ठेवा आहे आणि ही श्रीमंती न मोजता येणारी आहे असं मला त्यावेळी वाटत असे.
पुढे १९८७ मध्ये प्रगत अभ्यासक्रम सुरु केल्यानंतर यातल्या काही निवडक साधनासूत्रंाचं वाचन करणं, त्यातले बारकावे समजून घेणं, विकासाच्या दिशा निश्चित करणं असं मी १५-२० निवडक विद्यार्थ्यांबरोबर करीत असे. हे काम जवळजवळ १९९४ पर्यंत चालू होते.
२००० साली अंजली निवंडीकर ही कार्यकर्ती आल्यानंतर प्लॅस्टिक फोल्डरमध्ये साधनासूत्रांच जतन करणं हे महत्वाचं काम झालं. पुढे विभावरी घावरे व विजय भंढारे यांनी संगणकामध्ये ९२ साधनासूत्रे प्रविष्ट केली.
२००३ मध्ये ही साधनासूत्रे कशी प्रकाशित करावी यंाच्याविषयी चर्चा चालू असतांना साधनासूत्रांचं विषयाप्रमाणे वर्गीकरण आम्ही केलं.
प्रस्तावना व साधनासूत्रे एकत्र करुन विषयाप्रमाणे पुस्तिका प्रसिध्द कराव्यात अस ठरलं.
भारतीय सन, देवदेवता या विषयावरील १९ साधनासूत्रे मिळाली.
विविध थोर व्यक्तींविषयी त्यांनी लिहिलेल्या अनुभवाविषयीची सूत्रे ८ मिळाली.
संतावर त्यांनी लिहिलेली १४ साधनासूत्रे मिळाली.
भारतीय तत्वज्ञान आणि साधनेचे विविध मार्ग यावर त्यांनी लिहिलेली साधनासूत्रे ५३ आहेत.
संशोधनाचा राहिलेला भाग :
मूळ प्रतीप्रमाणे संगणकामधल्या डाटाची तपासणी व दुरुस्त्या करणे.
सर्व साधनासूत्रांची प्रिंटरवर छपाई करणे.
प्रस्तावना आणि साधनासूत्रे एकत्र करुन ७-८ पुस्तकांची निर्मिती व प्रकाशन करणे.
सहाय्य केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व कार्य. विश्वस्तांचे मन:पूर्वक आभार!
जानेवारी २००४ ते डिसेंबर २००४
सुरवातीला प्रस्तावना आणि साधनासूत्रे दोन वेगवेगळया ग्रंथामध्ये प्रकाशित करण्याचा विचार होता. मागील वर्षी प्रस्तावना आणि साधनासूत्रे खोलवर वाचल्यानंतर त्या दोन्ही मधील साहित्य एकत्र करुन त्यांचे वर्गीकरण करुन वेगळे गं्रथ प्रकाशित करावे, असं ठरलं. त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करणे आणि प्रकाशकाला देणे, एवढं काम बाकी आहे.
आभार : या कामामध्ये श्री. प्रमोद गोवंडे आणि कु. अंजली निवंडीकर यांची मदत झाली, त्यांचे मनापासून आभार.
डॉ. ऋजुता विनोद
प्रमुख संशोधक