प्रकल्प: ४
शीर्षक : विविध मान्यवर लेखकांच्या प्रकाशित पुस्तकांना महर्षि विनोदांनी लिहिलेल्या प्रस्तावनांचा आढावा घेणे.
श्री.रामभाऊ जोशी या महर्षि विनोदांच्या अनुग्रहित व ज्येष्ठ पत्रकार अशा निष्ठावान मानसपुत्राने केलेल्या फाईल्स् बघताना प्रस्तावनांचं मूळ हस्तलिखित असलेली एक फाईल आम्हाला सापडली. त्यामध्ये एकूण ४५ प्रस्तावनांच्या संदर्भांची केलेली यादीही सापडली. या हस्तलिखितातला मजकूर विभावरी घावरे यांनी संगणकामध्ये टाइप केला.
या प्रस्तावनांच्या संदर्भामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव इ. तपशील सापडला. अगदी थोड्याच प्रस्तावनांच्या बाबतीत प्रकाशनाचा दिनांक सापडला.
साधनासूत्रांचे आणि प्रस्तावनांचे वर्गीकरण करून विषयानुसार पुस्तिका बनवाव्यात, असं ठरवलं.
त्यानुसार हे वर्गीकरणाचे काम मी केले.
संतांवर लिहिलेल्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावना एकूण ११ आहेत.
एकूण १३ चरित्र ग्रंथांना प्रस्तावना दिलेल्या आढळल्या.
तीन प्रस्तावना आरोग्यविषयक आहेत.
उरलेल्या प्रस्तावना भारतीय तत्त्वज्ञान, योगसाधना याविषयी आहेत.
मूळ हस्तलिखित प्लॅस्टिक फोल्डरमध्ये जतन करून त्याची यादी करण्याचे काम अंजली निवंडीकर यांनी केले.
संशोधनाचे राहिलेले काम :
१) महर्षि विनोद यांच्या लायब्ररीमध्ये असलेल्या पुस्तकांचा संगणकामध्ये जो वरींरलरीश आहे, त्यामध्ये प्रस्तावनांचा स्रोत असलेले मूळ ग्रंथ शोधणे.
२) संगणकामध्ये टाईप केलेल्या प्रस्तावना हस्तलिखिताप्रमाणे तपासणे व प्रिंट करून घेणे.
३) विषयाप्रमाणे साधनासूत्रे व प्रस्तावना एकत्र करून पुस्तकं प्रसिद्ध करणे.
हे काम पूर्ण व्हायला दोन वर्षे सहज लागतील.
या प्रकल्पामध्ये सहाय्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे व अर्थसहाय्य पुरविणाऱ्या कार्य. विश्वस्तांचे आभार.
डॉ. ऋजुता विनोद
प्रमुख संशोधक
जानेवारी २००४ ते डिसेंबर २००४
यावर्षी झालेले काम :
१) संगणकामध्ये टाईप केलेल्या प्रस्तावना हस्तलिखिताप्रमाणे तपासल्या व िळीिीं करून घेतल्या.
२) त्याच प्रमाणे साधनासूत्रे तपासली आणि िळीिीं करून घेतली.
राहिलेलं काम :
ज्या मूळ ग्रंथामध्ये या प्रस्तावना होत्या त्या ग्रंथांचा शोध घेणे, हे महत्वाचं काम बाकी आहे. कु. सुनंदा काकडे हिच्या सहाय्याने पुढील वर्षामध्ये ते करण्याची योजना आहे.
चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यत साजऱ्या केल्या जाणाऱ्या
निवडक भारतीय उत्सवांविषयी लिहिलेली व प्रकाशित केलेली साधनासूत्रे असलेली फाइल प्रकाशनासाठी तयार आहे.
उरलेल्या प्रस्तावना व साधनासूत्रे यांचे विषयानुसार वर्गीकरण करणे आणि अंतिम कोष्टक करणं बाकी आहे.
३)पुढील वर्षामध्ये हे वर्गीकरण पूर्ण करून प्रकाशकाकडे देण्याचे योजले
आहे.
कार्यकर्त्याचे आभार :
मूळ हस्तलिखिताप्रमाणे प्रस्तावना व छापील साधनासूत्रे यांचा संगणकात प्रविष्ट केलेला वरींर तपासण्याचे किचकट काम श्री. प्रमोद गोवंडे यांनी अतिशय बारकाईने व नेटाने पूर्ण केले. त्यांना अंजली निवंडीकर हिने मदत केली.
डॉ. ऋजुता विनोद
(प्रमुख संशोधक)