प्रकल्प: ३
शीर्षक : युवावस्थेमध्ये महर्षि विनोदांनी लिहिलेल्या इंग्रजी कवितांचा शोध घेणे.
शांतिमंदिरमध्ये जतन करून ठेवलेल्या वाङ्मयाचा शोध घेणं चालू असताना महर्षि विनोद यांनी लिहिलेल्या आतापर्यंत एकूण ६० इंग्रजी कविता सापडल्या. त्यातील २४ प्रकाशित कविता आहेत आणि ३६ अप्रकाशित आहेत. प्रकाशित कविता मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजच्या मासिकांमध्ये साधारण १९२४ ते १९२७ या काळात प्रसिद्ध झालेल्या आढळल्या. एक कविता छशु खविळर नामक मासिकामध्ये असलेली सापडली. इतर कवितांच्या प्रकाशनाचा संदर्भ अजून हाती लागलेला नाही. सर्व कविता महर्षि विनोदांच्या स्वत:च्या अनुभूतीतून प्रकट झालेल्या दिसतात. हळुवारपणा, सौंदर्य, सत्यदर्शनातील कठोरता, तरलता, भाषेचं सौंदर्य यांचा परिपाक आहेत, असं दिसतं.
या कामाला सुरूवात २००० मध्ये केली. प्रथम प्लॅस्टिक फोल्डरमध्ये जतन करणं, वर्गीकरण करणं, यादी करणं असं काम अंजली निवंडीकर यांनी केलं. विभावरी घावरे यांनी संगणकामध्ये या कविता टाइप केल्या. मूळ हस्ताक्षराप्रमाणे आणि प्रकाशित पानांप्रमाणे संगणकामधील साहित्य तपासणं व दुरुस्त्या करणं हे काम मी व श्री. प्रमोद गोवंडे यांनी केलं. महर्षि विनोदांच्या हस्ताक्षरातील काही शब्द पानं जुनी झाल्यामुळे आणि शाई फिसकटल्यामुळे नीट वाचता येत नाहीयेत. सर्व कविता प्रिंटरवर छापून झालेल्या आहेत.
संशोधनाचा राहिलेला भाग :
१) जे शब्द वाचायला अडले आहेत, ते प्रयत्न करून समजून घेणे.
२) या कविता प्रकाशित करणे. हे काम प्रकाशक मिळण्यावर अवलंबून राहील.
या संशोधनामध्ये मदत करणारे कार्यकर्ते आणि अर्थसहाय्य करणाऱ्या कार्य. विश्वस्तांचे आभार.
डॉ. ऋजुता विनोद
प्रमुख संशोधक
जानेवारी २००४ ते डिसेंबर २००४
इतर प्रकल्पातील काम शेवटच्या टप्प्यामध्ये आणणं, याला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं असल्यामुळे इंग्रजी कवितांवरचं राहिलेलं काम २००४ या वर्षी केलं नाही. योग्य वेळी हे काम पुढे नेण्याचा विचार आहे.
डॉ. ऋजुता विनोद
प्रमुख संशोधक