जवळजवळ १९४० सालापासून महर्षींच्या नित्य सहवासात असलेल्या भक्तांनी-सहाय्यकांनी महर्षी व त्यांच्या पत्नी मॆत्रेयी यांना आलेली पत्रे, त्यांनी लिहिलेले साहित्य, त्यांची पुस्तके, त्यांच्या कार्याची विविध देश-परदेशांतील वृत्तपत्रांत केलेली प्रशंसा यांचे काळ्जीपूर्वक जतन केलेले होते.
यामध्ये दिगंबर गोखले, सुमनताई महादेवकर, रामभाऊ जोशी यांचा सिंहाचा वाटा आहे.
१९८४ पासून महर्षींची धाकटी सून डॊ. ॠजुता यांनी हे सर्व विचारधन शोधायला सुरुवात केली. त्यांना अनेक विद्यार्थी सहाय्यक म्हणून लाभले. त्यांनी केलेले संशोधनाचे तपशील येथे देत आहोत.