प्रकल्प क्र. १ (१९८३ पासून डिसें. २००३ पर्यंत)
शीर्षक : म. विनोद यांनी सांगितलेल्या अतीन्द्रिय अवस्थेतील वाङ्मयाचा मागोवा घेणे.
१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक सापडले.
पुढे १९८४ या वर्षी `महर्षि विनोद जीवन दर्शन' या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. त्यामध्ये दुसरा लेख श्री.ज्ञाननाथजी रानडे यांनी कथन केलेला आणि सुमन महादेवकर यांनी लिहून घेतलेला असा आहे. त्यात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत. त्याचे विलक्षण वर्णन ज्ञाननाथजी रानडेंनी कथन केले आहे. ते वाचूनच मी खूप भारावून गेले होते. पेटीतल्या त्या कागदांना स्पर्श करतानाच मी रोमांचित झाले होते आणि डोळयांमध्ये अश्रू आले होते. आता यापुढे हे धन आपल्यालाच जतन करायचे आहे आणि शक्य झाल्यास प्रकाशित करायचे आहे, अशी खूणगाठ मी त्यावेळेला बांधली होती.
१९८४ साली व्यक्तिमत्त्व विकास शिबीर पूर्ण केलेला विष्णू केळकर हा विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून नियमितपणे त्याचं योगदान देण्यासाठी येत असे. त्याचं मोत्यासारखं अक्षर पाहून मला सरदार मेहेंदळेंच्या अक्षराची आठवण झाली. मी ते पेटीतले वाङ्मय त्याला दाखवलं आणि याची कॉपी करशील का, असं विचारलं. तो आनंदानं तयार झाला. सलगपणे ६ महिने एकचित्तानं सर्व वाङ्मयाची प्रत करण्याचं काम त्याने पूर्ण केलं. त्याचे आभार मानावे, तेवढेच थोडे.
पुढे आशिष देशपांडे या कार्यकर्त्याने (१९९९ साली) हे कागद वर्षाप्रमाणे लावून घेतले. त्यात आम्हाला सरदार मेहेंदळेंच्या हस्ताक्षरातील वाङ्मय लेखनाची मूळ प्रत सापडली शिवाय फाऊंटन पेनने लिहिलेल्या प्रती सापडल्या. मूळ प्रत आणि कॉपी आम्ही वेगळं केलं.
आशिष देशपांडेने संगणकावर डाटा घालण्यासाठी ज्या दोन फाईल्स् बनवल्या, त्याचं वर्गीकरण ुळींह लिाााशिरींीू आणि ुळींहिीर्ीं लिाााशिरींीू असं केलं. थळींहिीर्ीं लिाााशिरींीू असलेल्या श्लोकांवर कोणतेही भाष्य लिहिलेलं आढळलं नाही. थळींह लिाााशिरींीू श्लोकांच्या डावीकडे, उजवीकडे. कधी मराठी तर कधी इंग्रजीमध्ये बरंच लेखन केल्याचं सापडलं.
विभावरी घावरे व विजय भंडारे यांनी २००० वर्षापासून संगणकामध्ये हे हजारो श्लोक घालण्याचं काम ९५% पेक्षाही अधिक अचूकतेनं केलं. ज्ञानप्रबोधिनी शाळेत शिक्षण झाल्यामुळे संस्कृती भाषेशी शालेय वयात उत्तम परिचय झालेला असल्यामुळे इतकी अचूकता त्या वरींर शिींीू मध्ये येऊ शकली.
२००३ साली ज्योतीताई काळे या महर्षि विनोदांच्या अनुग्रहीत, बँकेच्या सेवेतून मुक्त होऊन संस्थेच्या कामामध्ये योगदान देण्यासाठी नियमितपणे येऊ लागल्या. महर्षि विनोदांचा सहवास लाभलेल्या आणि त्यांच्याविषयी अपार श्रद्धा असलेल्या ज्योतीताइंर्ना हे अतीन्द्रिय वाङ्मय मी दाखवले. त्यातील एसिश्रळीह उिाााशिींीू ची लििू वेगळया फुलस्केप कागदावर तुम्ही कराल का, असे त्यांना विचारले. त्यांनी आनंदानं होकार दिला. अधूनमधून असलेला तब्येतीचा त्रास व लांबवर असलेलं घर या अडचणींतून जसा वेळ मिळेल तसा पण एकाग्रतेने त्यांनी एसिश्रळीह लिाााशिरींीू हाती लिहून काढली.
२० वर्षे संस्थेला पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कार्याचा गौरव करणारा लेख डॉ.संचेती यांनी दै.सकाळसाठी लिहिला होता. तो प्रसिद्ध झाल्यानंतर ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या श्री.प्रमोद गोवंडे यांनी संस्थेसाठी विनामूल्य काम करण्याची इच्छा व्यक्त केली. इंग्रजी कवितांचं काम ज्या नेटकेपणानं व कार्यक्षमतेनं केलं, ते पाहून अतीन्द्रिय वाङ्मय संगणकावर जे टाइप केलं होतं ते मूळ प्रतीप्रमाणे तपासण्याचं काम त्यांना द्यावं, असं मला वाटलं. सलग दोन महिने त्यांनी हे तपासणीचं आणि दुरुस्त्यांचं काम पूर्ण केलं. तसेच वर्षानुसार व महिन्यानुसार यादी करण्याचं कामही पूर्ण केले.
१९३८ पासून ते १९४५ या सालांमध्ये या वाङ्मयाची निर्मिती झाली असल्याने आम्हाला दिसले. त्यातला ७० ते ८०% भाग १९३८ व ३९ वर्षांमध्ये घडलेला आहे. १९३८ आणि ३९ या वर्षांतील वाङ्मयाची प्रिंटरवर छपाई करून झालेली आहे.
संशोधनाचा राहिलेला भाग :
१) सर्व श्लोकांना अनुक्रमांक देणे
२) छापलेल्या प्रतीवर िशिळिसि ींळाश आणि लश्रिळीसि ींळाश देणे - (एकाच दिवशी तीन-तीन, चार-चार टप्प्यांमध्ये म.विनोदांनी हे वाङ्मय कथन केलेले आहे. प्रत्येक टप्प्याच्या सुरूवातीला व शेवटी असलेली वेळ सरदार मेहेदळेंनी टिपून ठेवलेली आहे. एकाच दिवशी नवीन टप्पा चालू असताना श्लोकांचे क्रमांक पुन्हा एकपासून चालू केलेले आहेत. त्यामुळे िशिळिसि ींळाश आणि लश्रिळीसि ींळाश घातला की किती भागात एका दिवशी काम झालं, हे समजू शकेल.
३) १९४१ ते १९४५ मधील श्लोकांची प्रिंटरवर छपाई होणं.
४) सध्या सर्वच श्लोक त्याच्या लिाााशिरींीू विना घेतलेले आहेत. या वाङ्मयाचं प्रकाशन सुरूवातीला लिाााशिरींीू विरहीत वाङ्मयाचं करावं, असं सध्यातरी वाटतं आहे. लिहिलेली एसिश्रळीह लिाााशिरींीू मूळ प्रतीवरून तपासणे आवश्यक आहे. ते काम पूर्ण झाल्यावर लिाााशिरींीू चा समावेश ग्रंथामध्ये करता येईल.
५) या सर्व वाङ्मयाचं एका ग्रंथामध्ये प्रकाशन करावं अशी माझी इच्छा आहे, ज्याला प्रस्तावना लिहिणारी विभूती शोधण्याचं काम करावं लागेल. शक्य झाल्यास या वाङ्मयाचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या जाणकाराचाही शोध घ्यावा लागेल.
वर नमूद केलेल्या सर्व सहाय्यकांचे व कार्य. विश्वस्तांचे मन:पूर्वक आभार
डॉ. ऋजुता विनोद
(संशोधन प्रमुख)
(जानेवारी २००४ ते डिसेंबर २००४)
या वर्षी पूर्ण झालेला भाग:
सर्व श्लोक दिनांक व वेळेप्रमाणे ओळीने लावून घेतले.
सर्व श्लोकांना अनुकमांक दिले.
वर्ष, दिनांक, श्लोकांची संख्या आणि पानांचे आकडे यापमाणे एक प्र- दीर्घ कोष्टक तयार केले.
हे कोष्टक आणि सर्व श्लोक िळीिीं करून घेतले व त्याची एक फाईल तयार केली.
कोष्टकाप्रमाणे, ऑगस्ट १९३८ पासून ते फेबु. १९४४ पर्यंत एकूण १६५१ श्लोक लिहिले गेलेले आहेत असं आम्हाला आढळलं.
हे प्रिटींग लिाााशिींीू नसलेल्या श्लोकंाचे केलंं.
एसिश्रळीह लिाााशिींीू जेवढी वाचता आली तेवढी हाती लिहून झालेली आहे. जो वाचायला अवघड भाग होेता, तो समजून घेणे बाकी आहे.
या ारीींशी लििू ची एक ुशीिु लििू महर्षींचे व्दितीय चिरंजीव श्री. उदयन विनोद ( वास्तव्य न्यू जर्सी, णडअ) यांच्याक डे पाठवली आहे. तेथे स्थायिक झालेल्या विव्दानांकरवी या अतिन्दिय वाङमयाचा सामान्य माणसाला समजून घेण्याजोगा काही अर्थ लागतो का, याचा प्रयत्न चालू आहे.
संशोधनातील राहिलेला भाग :
१) सर्व एसिश्रळीह लिाााशिींीू ची वरींर शिींीू होणं बाकी आहे.
२) या ग्रंंथाला अधिकारी व्यक्तीची प्रस्तावना मिळवणं आणि विवरणासहित
हा ग्रंथ प्रकाशित होणं बाकी आहे.
आभार :
मूळ हस्तलिखिताप्रमाणे संगणकात प्रविष्ट केलेले श्लोक तपासणं आणि ते काळवेळापमाणे ओळीने लावून घेणं, व ते प्रिंट करणं हे बरंच किचकट काम होतं, ते काम शांतपणे आणि अचूकतेने श्री. प्रमोद गोवंडे यांनी पहिल्या सहा महिन्यात पूर्ण केलं. एसिश्रळीह लिाााशिींीू वाचून तिचं हस्तलिखित तयार करण्याचं काम ज्योति काळे या महर्षींच्या अनुग्रहित शिष्येने तब्येत सांभाळून केले. त्यांचे व सर्व कार्यालयीन सहाय्यकांचे विनोद कुटुंबियांच्या आणि संस्थेच्या वतीने मी आभार मानते.
संशोधन प्रमुख
डॉ. ऋजुता विनोद