अभंग

सत्य जें जें वाटे - बुद्धिनेत्रा माझ्या। दिसे ते उफराटे - दुज्या क्षणी।।

तुझा जो भासला ओंठ स्वप्नकाली।

असे तीन पाकळी फुलाचीच ह्या ॥

देव आता ठरला तसा मनाचा संभ्रम।

आणि तोही देहधर्म - प्रेम माझे॥११॥

 

करी माझा तर्क कां तुझी प्रार्थना।

ज्ञान श्रद्धा रुप - असे माझें ॥

संशयांनी (सुद्धा) तुझे सत्य सजले।

स्वप्नमार्गे आलें वस्तुतत्त्व ॥१२॥ (स्वप्नतेजें नटले वस्तुतत्त्व।)

 

अप्रेम वाढले मनीं स्वत: विषयी।

तत्व आले ध्यानीं निराकार ॥

शून्य सत्य आले घ्यावयास-जनन।

प्रसूति-वेदना तयांच्या ह्या ॥ (प्रसव दु:ख झाले बुद्धिला हे)

जीव बावरून श्वास कोंदे जरा ।

कुणी सावरून धरा मला ॥१३॥

 

भीति एक होती विनाश अंतिम।

अनुभवील प्रेम कधीतरी ॥

परी गोड इतुका होता मनाला संशय।

आत्म्यांत संश्रय मिळेल त्या ॥

परी कुठला आत्मा निरात्म शून्यतें।

शेवटी चुंबिते आत्मदेवा ॥१४॥

 

तुझ्या स्वप्नामध्ये मूर्ति माझी आली।

प्रीति ती आठवली तुला माझी ॥

स्वप्न मूर्तीला तू रुकार देऊनी।

गाढ अलिंगनी चुंबिलेस ॥१५॥

 

सखे तीच स्थिति सदां मी चिंतिली।

देहभावी नुरली आस-आता ॥

वृत्ति नाही भुलली ।

देहभावा ॥१६॥

 

माझ्याच स्वप्नाला सर्वदा पूजिले।

तुझें नाव दिधले तया व्यर्थ ॥

परी सत्यापुढे स्वप्न ते पामर।

मनो गीतापेक्षा किती गोड सूर ॥१७॥ (स्वप्न ते पामर-तुझ्या पुढे)

 

प्रेम माझे-मोह-विश्व सारे स्वप्न।

ज्ञान हे अनुमान असो देवा ॥

असेना कांही ही मला काय त्याचे ।

स्वप्नात सत्य जें वाटे - बुद्धिनेत्रा ।

दिसे ते उफराटे - दुज्या क्षणी ॥१८॥

 

सत्यता सुंदर - कल्पनेपेक्षांही।

दुजी ठावी नाही - कुठे मला ॥१९॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search