अदृश्य तव मूर्ति - तशीच राहूं दे।
तुझी दिव्य कांति कशी साहूं ॥
निर्विकार मुद्रा नेत्रीं परकेपणा।
भेवडावी मना सदा माझ्या ॥
कधी सुद्धां नको नेत्रनेत्रा भिडणें।
नको भेट होणें तुझी माझी ॥४८॥
तुझी हास्ये अथवा कटाक्ष हे सारे।
आणिती हे वारे इथे आज ॥
आनंद हास्याने - कटाक्षें वेदना जशा होती मना - सदा माझ्या ॥ तशाच दोन्ही त्या अनुभवांची स्मृती।
वारी कां जागृती - वायू - भेट ॥४९॥
करी /
सरकत्या लाटेच्या चल पृष्टावरी ।
धांव त्या मनाच्या अशा गर्भी ॥
तुझी मूर्ती वास करी कैशी सांग।
नवल हे जीवासी सदा वाटे ॥
तुझी माझी व्हावी कधी काळी भेट।
ही हि इच्छा (आशा) ठावी नक्षे जीवा नसे मजला ॥५०॥/
आकाश हें नील, तुझ्या कटाक्षांनी ।
कां असें होऊनी, इथे शोभे ॥
सर्व माझे जन्म, आणि सारी मरणें।
या नील रंगाने, रंगु देना ॥५१॥/
अस्पष्ट उद्धार हळूच काढूनी ।
वेड का या मनी धाडिलेस ॥
कोणत्या अर्थाचा असावा तो ह्याची।
मना शंका जाची सर्व काल ॥
भीति घेती माय तसें सुद्धा मन।
जात तो अर्थ न कधी व्हावा ॥५२॥/
अदृष्ट सौंदर्य नेत्र हे पाहती।
मनोवृत्ति ध्याती तुझें रुप (शुन्यरुप) ॥
जया न आकृती अंतराला किंवा।
वेड लागे जीवा - अशा विषयी ॥५३॥ (कसे त्याचे)/
१३-९-१९५८