अभंग

सख्या वर्तमाना तुझ्या पंखावरी। बसूं दे क्षणभरी

उच्छिष्ट जें तुमचे, सुधा तीच माझी।

जीव माझा राजी, सेविण्या ती ॥

स्वरूपांत तुमच्या, पाहिला मी देव।

वाहिला हा जीव, पदीं तुमच्या ॥

दगडांत सुद्धा, त्या देवतांचा वास।

नको हा आभास, म्हणूं माझा ॥१॥

 

अस्पृश्य कसला, तू अतिस्पृश्य मज।

किती पतित झाला, जीव माझा ॥

तुला मी टाकिलें, किती वर्षे युगें।

आत्म-नेत्र जागे, आज झाले ॥ क्षु

द्र इतुका मी, जो तयाने हा कसला।

स्पर्शिण्याचा तुजला, धीर केला ॥२॥

 

इतरांचे वैभव, पहावेना जिला।

दृष्टि ही कशाला, मला व्हावी ॥

आंधळा भिकारी, उभा दारीं आहे ।

नेत्र देऊ कां हे, तयाला मी ॥३॥

 

जानेवारी १९२७

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search