लाकडांची शय्या गोवर्यांच्या गाद्या।
दहि रायाला द्या (मापझयाच) ॥
निजूं द्या त्यावरी - तया कांही काळ।
पाहुं द्या आभाळ - सुप्त नेत्री ॥
पाकळीच्या आड नाही (किाठंि दवि)।
कळूनीया येई तया जेव्हा ॥
तेव्हा मडकयांतला निखारा काढूनी।
द्या मला भडाग्नी तल्क्षणीच ॥
शून्यांत जाउंद्या मिळूनी हि शून्य।
शून्याचा अनन्य भक्त मी ॥१॥
श्वास हा शविटला जगा आशीर्वाद।
देऊनीया साद - तुला झाली ॥
चिंधड्या चिंधड्या हृदयाच्या झाल्या।
आिक्षिाही गल्यिा - दूर काठिें ॥
इष्टाचाच झाला अभाव नंतरी।
इच्छांना अंतरी - कसा ठेवू ॥
संलिि जीपवत पदवस कैसि मिााज्ू।
र्ेंाीज नुरता रुजुं - काय लागि ॥२॥
सये या चित्तांत तीच दृष्टि टाक।
जिला न ठाऊक - मुळी अश्रू ॥
तुझ्यासाठी मी सदा गाळियेले।
मनीं त्यांचे उरले - निखारे हे ॥
धगधगीत तेजा तयांच्या पाहुनी।
तुझ्या नेत्रांतुनी - गळो पाणी ॥३॥
वरी पाहूं तरी कुठे न आधार।
भोंवती अंधार दाटला हा ॥
मागें पुढे खाली जेथ तेथे रात्र।
ठेचाळते चित्त - सर्व जागीं ॥
सख्या देहा येना स्वस्थ येथे बसूं।
एकमेकां पुसूं - खेद मोद ॥४॥
जळाला हा देह विमान आगीचे।
हवे मध्ये नाचे - तेज युक्त ॥
तयांत बैसुनी - येता तुझ्याकडे।
कोण हे बडबडे - अभंगास ॥
नव्हेत ते माझे कंठगीत शब्द।
तयांशी संबंध नुरे माझा ॥५॥
गिळूनी मरणांना कृष्ण झाला काळ।
ढगांनी आभाळ - वरी जैसे ॥
काळांत जीवाचे अमरत्व तें गुप्त।
ढगी जैशी लुप्त् विद्युल्लता ॥६॥
मायेच्या जाळयांत गुंतला हा गळा ।
सारख्या या कळा लागता॥
कधीं मी सुटणार एकदा त्यातुनी।
आणि जगांतुनी अशा याही ॥
नको देवा असल्या व्यर्थ गुंतागुंती।
वृत्ति ना तुष्टती - ऐहिकांत ॥७॥
सहज त्या मानेची मोडणी मोहक।
करुनीया हांक कोण मारी ॥
डोळयांत ओतिला - दिव्य तेजोरस।
बिंबले मानस - कटाक्षांत ॥
क्षणांत दोघांच्या मनीं जें उमलले।
ते फूल हांसले चार गालीं ॥८॥
कंप तो अधरांत दिसूनीया काय।
पुन्हा नष्ट होय तुझा धीर ॥
नको बोलू सये तुझा अर्थ स्पष्ट।
बोलण्याचे कष्ट कशाला हे ॥
थरारे तो अधर तरळतो जो नेत्र।
प्रेम हे पवित्र त्यांत नाचें ॥९॥
शिलेवरी एका पडूनीया स्तब्ध।
चिंतिले प्रारब्ध - सर्व माझे ॥
क्षुद्र हें जीवित जन्म कां घेतला।
का न जीव गेला शैशवांत ॥
दास्यात डुबलेल्या मायभूमीसाठीं।
ज्वाला मुखी पोटी सुखे जावें ॥
नको हें आयुष्य कुटुंब सेवेचे।
त्याहूनी मृत्यूचें बरें सौख्य॥१०॥
१-११-५८