प्रस्तावना

श्री ज्ञानेश्वरी एक प्रचंड ‘ज्ञानकोश’ आहे, हा ज्ञानकोश पाहता येण्यास ‘प्रत्यक्ष’ गुरुसाहाय्याची अर्थात अपेक्षा आहे

-९-

श्री ज्ञानेश्वरी ही ज्ञानाची ईश्वरी आहे, विश्वज्ञानाचा व ज्ञानविश्वाचा तो एक प्रचंड ‘ज्ञानकोश’ आहे. आंतर अनुभवाच्या कोणत्याही ‘पदाचा’ अर्थ त्यात विशद केलेला आढळेल.

हा ज्ञानकोश पाहता येण्यास ‘प्रत्यक्ष’ गुरुसाहाय्याची अर्थात अपेक्षा आहे - अतीव अपेक्षा आहे. पण तिचे अभावी श्री ज्ञानेश्वरांचा ईश शब्द पौर्वदैहिक बुद्धिसंयोग असेल, परमावधीची विनम्र वृत्ती असेल, तर शेवटपर्यंत स्वयमेव प्रकाशक व साहाय्यक ठरेल.

‘यदृच्छया’ गुरुसंपर्क लाधण्याचा योगच आला नाही, असेल, तर श्री ज्ञानेश्वर अवश्य साहाय्यहस्त देतील.

पण, ‘मला साजेसे गुरु म्हणजे एक श्री ज्ञानेश्वरच’ - असल्या उद्दाम व अज्ञ अहंकाराच्या हाकेला उत्तर देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर, वाट पाहून राहिले आहेत असा मात्र याचा अर्थ नव्हे!

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search