-४-
ब्रह्मनिष्ठ भारतीय संस्कृतीची ‘ब्रह्मपुत्रा’ यज्ञ, योग, ज्ञान, भक्ती व कर्म अशा पंच आप:प्रवाहांनी परिपुष्ट आहे.
श्रीज्ञानेश्वरीत या पंच ‘आपां’चा पंचप्रवाहांचा - प्रयागराज सिद्ध झाला आहे.
प्रज्ञानाची छटा वैशिष्टयाने, ठळकपणे चमकत असली तरी, श्रीज्ञानेश्वरीत तद्तर मार्गांचे, विशेषांचे व दृष्टीकोनांचे सम्यक् विवेचन आहे.
श्रीज्ञानेश्वरीत भावार्थाचेही दीपन आहे. ‘भावार्थ दीपिका’ हे तर ज्ञानेश्वरीचे नामांतर आहे. पण तेथेही एक सूक्ष्म श्लेष आहे. नुसता ‘भाव’ हा दीपनविषय नसून भावाचा अर्थ उजेडात आणावयाचा आहे. उपनामदेखील किती सूचक व अर्थगर्भ आहे हे ध्यानात घेण्यासारखे आहे.