-२-
महाराष्ट्र-संस्कृतीची विविध वैशिष्ट्ये ही श्री ज्ञानेश्वरांच्या मानस सरोवरात बहरलेली सुवर्णकमले होत.
महाराष्ट्राच्या आंतरजीवनाची जाह्नवी श्री ज्ञानेश्वरीने रेखाटलेल्या विशाल पात्रांतून वाहत आली आहे.
महाराष्ट्राचे स्वातंत्र्यप्रेम, महाराष्ट्राच्या भक्तियोगाचे ज्ञानवैशिष्टय महाराष्ट्राचा नामनिष्ठ भागवत धर्म, महाराष्ट्राची कणखर तितिक्षा, महाराष्ट्राचे स्वावलंबन, महाराष्ट्रीय आचारातले प्रखर बुध्दिप्राधान्य, हे सर्व सांस्कृ्तिक विशेष, व्यावर्तक गुणधर्म आहेत.
श्री ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्रीय संस्कृतीची ऐतिहासिक गंगोत्री व श्रीज्ञानेश्वर हेच महाराष्ट्राचे परमपूज्य पितृतीर्थ होत.